Monday, September 11, 2006

मैफल रंगलेली


मस्तीत दंगलेली
मैत्रीत झिंगलेली
चार वर्षांची अशी
ती मैफल रंगलेली ...........

मस्तीत दंगलेली
दंग्यात हासलेली
हास्याने पोसलेली
ती मैफल रंगलेली ...........

मैत्रीत झिंगलेली
झिंगेत माजलेली
माजात सावरलेली
ती मैफल रंगलेली ..........

चार वर्षांनी ती
मैफल पांगलेली
मनातल्या मनात अजुनही
ती मैफल रंगलेली ..........

ती मैफल रंगलेली
तुमच्या प्रेमच्या सवेत
आज आठवणींच्या कवॆत
ती मैफल रंगलेली ..........
खरंच सांगतो !

खरंच सांगतो, आजकाल रात्री मी शांत झोपतो !

तुझ्या सगळ्या आठवणींचं एक गाठोडं केलयं,
मेंदूच्या वरच्या माळ्यावर केव्हाच टाकून दिलयं,
सध्याच्या धावपळीच्या दिवसात तिथे पाहायला वेळ कुठे मिळतो ?

खरंच सांगतो, आजकाल रात्री मी शांत झोपतो !

स्वप्नंसुद्धा आजकाल भविष्याचीच पडतात
नवी नवी स्वप्ने जुन्या स्वप्नानांच दिसतात
तुझ्या गुलाबी स्वप्नांना तिथे वाव कुठे असतो ?

खरंच सांगतो, आजकाल रात्री मी शांत झोपतो !

तरिही कधीतरी हळुच तु येतेस
आठवणींचं बोचकं उघडुन बसतेस
अशावेळी नेमका घडाळ्याचा गजर होतो
पहाटेच स्वप्न खरं व्हायची मी वाट पाहत बसतो

खरंच सांगतो, आजकाल रात्री मी शांत झोपतो !
मी माझ्या मनाचा !
आसमंत मी निरभ्र पुनवेचा,
आनंद मी जलतृप्त धरणीचा,

अटळ जरी बंधने नियतीची,

असे परि मी माझ्या मनाचा !

रंग मी श्रावणी जंगलांचा,

ढंग मी नागमोडी वळणांचा,

छंद मी कान्ह्यावेडया गोपीकांचा !

गारवा मी पाहिल्या पावसाचा,

मारवा मी तासलेल्या गळ्याचा,

सावरा मला मी वाराच्या वेगाचा !

दूत मी अकालनीय काळाचा,

सुर मी बदलत्या नात्यांचा,

दूर जरी सर्वांपासून तरी आहे सर्वांचा !

अटळ जरी बंधने नियतीची,
असे परि मी माझ्या मनाचा !

पहिली कविता

पहिले पाऊल प्रेमाचे पडले जेव्हा तुझ्या साथीने

डोळे बोलले माझे माझ्या शब्दांच्या वतीने

पहिल्या प्रीतिची ही रित तुझी सदॆव संगत

डोळ्यांत अजुनही माझ्या सुखस्वप्न रंगणारे

आसवांना नाही थारा नाही दुःखांना प्रवेश

आपल्या प्रेमाच्या दुनियेत सुख सदा हसणारे

निराळी ही दुनियादारी तिचे अजब नियम

पण प्रेम आपले हे त्यात कधी न फसणारे

कसे अतुट हे नाते किती वादळे पाहिली

घाव कितीही घातले तरि न तुटणारे

प्रेम तुझे नी माझे कधी न संपणारे

उभ्या दुनियेला पुरुनतरि थोडेसे उरणारे

भातुकलीच्या खेळातले मी राजा तु राणी

या सर्व प्रेमशत्रुंशी सतत झुंजणारे

दुनियेची भिती थोडी होती माझ्याही ठायी

हातात गुंफालेले हात कधी न सुटणारे

येता प्रेमाल बहर झाला शंकांचा कहर

आजच तुटुनिया गेले अधुरे स्वप्न हे उद्याचे

प्रेम करायचे होते तुझ्यावर जीवापाड
पण संशयी डोळे होते कितीतरी रोखलेले

निरोपाची येता वेळ पाय अडखळले माझे

निःशब्द मनाची समजूत काढती ओले माझे डोळे

वाटा तुझ्या नि माझ्या उद्या पुन्हा जुळतील

सारे तुटून जातील बंध हे अडणारे

सुखाचे दिवस हे कमी असतात दुनियेत

म्हणूनी दुःखाची चव त्याची गोडी वाढविते

एक दिवस पुन्हा येईल परतुनी

समजून घेतिल आता दूर करणारे

त्या दिवसाची आता वाट मी पहातो

अधुऱ्या प्रेमाच्या साथीने उद्याचे इमले बांधतो

पहिल्या प्रेमाची आता पहिली कविता लिहितो

आपल्या प्रेमाची कहाणी उभ्या जगाला सांगतो